Sunday, December 3, 2017

पुरोगामी माफ़ियांची दमदाटी



आपल्यालाच सत्य गवसले आहे याची माणसाला मनोमन खात्री पटली, मग तो तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेछूटपणे खोट्याचाही आधार घेऊ लागत असतो, असे जर्मन कवी विचारवंत हेनरिख हायने म्हणतो. सध्या मराठी प्रांतामध्ये व भारतीय पुरोगाम्यांमध्ये त्याची सातत्याने प्रचिती येत असते. त्या भ्रमातून कोणाला एका शहाण्याला बाहेर पडण्याची इच्छा झाली, तर त्यालाही कान पकडून खोट्याच्या पंगतीत बसवण्याची सक्ती होत असते. लोया नावाच्या न्यायमुर्तींचा तीन वर्षापुर्वी नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांच्यासमोर गुजरातच्या सोहराबुद्दीन चकमकीचा खटला चालू होता आणि त्यात भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. तर त्या मृत्यूचा संशय शहा यांच्या माथी मारण्याचा उद्योग तीन वर्षानंतर निरंजन टकले नामक एका पुरोगामी भामट्याने केल्यास नवल नाही. मागल्या पंधरा वर्षापासून हा उद्योग सातत्याने चालला आहे आणि त्यात पुरोगामी सातत्याने तोंडघशी पडलेले आहेत. कारवान नावाच्या खोटेपणासाठीच ख्यातनाम असलेल्या नियतकालिकात हा लेख छापून आला आणि त्यात किंचीतही तथ्य नसल्याने त्याची कुणाही जाणकाराने दखल घेतली नाही. उलट त्यातले मुद्दे व खोटेपणा मात्र शोधला गेला. त्यामुळे आपल्या पुरोगामी चळवळीचे वा खोटेपणाचे पितळ कसे आणखीनच उघडे पडले आहे. त्याने प्रकाश बाळ हे पुरोगामी पत्रकार व्यथित झाले तर नवल नाही. त्यांना त्याची जाहिर कबुली द्यावी असे वाटले आणि त्यांनी लोकमत या दैनिकात त्याचा उहापोह करून टाकला. निरंजन टकले यांनी हा खोटेपणा केला नसता, तर पुरोगामीत्वाचे पत्रकारितेचे आणि बुद्धीमत्तेचे असे वस्त्रहरण झाले नसते, हे बाळ यांनी जाहिरपणे सांगितले आणि पुणे विद्यापीठातले प्रा. हरि नरके यांचे पित्त खवळले. त्यांनी एखाद्या माफ़िया बॉसप्रमाणे प्रकाश बाळ यांना जाहिर धमकीच देऊन टाकली.

भारतातले असोत किंवा जगातल्या कुठल्याही देशातले संघटित गुन्हेगार माफ़िया असोत, त्यांची एक आचारसंहिता असते. ते आपापसातील वैर भांडणे एकमेकात बसून वा मुडदे पाडून सोडवत असतात. पण त्यापैकी कोणीही न्यायालय वा पोलिसात जाऊन बोलता कामा नये, असा दंडक असतो. तशी शपथ घेऊनच त्यांना माफ़िया टोळीत प्रवेश मिळत असतो. त्या शपथेला ओमेर्टा अ़से म्हणतात. त्याचा अर्थ असा, की आपल्या भांडणाचा विवादाचा कुठलाही लाभ पोलिस वा कायद्याला मिळता कामा नये. म्हणूनच आपसात कितीही रक्तपात झालेला चालेल. पण जाहिरपणे परस्पर विरोधातील विधाने वा भूमिका घ्यायच्या नाहीत. सर्वकाही आपसात गुपचुप निकालात काढायचे. नेमके तेच प्रकाश बाळ यांना हरि नरके सांगत आहेत. ते म्हणतात. ‘मा. प्रकाश बाळसाहेब, पुरोगामी आधीच संख्येने कमी आणि विखुरलेले आहेत. असे दोषदिग्दर्शन खाजगीतही करता आले असतेच ना? ते जाहीरपणे करून प्रतिगामी शक्तींना मदत करणारे लेखन करण्यापेक्षा, आणि त्याद्वारे सतत प्रकाशझोतात राहण्यापेक्षा काही बाबींवर मौन पाळा. सर्वच बॉल खेळलेच पाहिजेत का?’ ही नरके यांची मुक्ताफ़ळे आहेत. निरंजन टकले यांनी जो खोटरडेपणा जाहिर लेख लिहून केला आहे, त्यातले दोष त्रुटी व खोटेपणा उघडपणे सांगायचा नाही, अशी प्रकाश बाळ यांच्यावर नरके यांची सक्ती आहे. तसे जाहिर सांगितल्याने सत्याचा अपलाप वगैरे झालेला नाही. हे असे प्राध्यापक वा विचारवंत कसे धडधडीत खोटारडेपणा करीत असतात आणि कोणी त्याला वाचा फ़ोडली तरी माफ़ियांसारखे त्याचा आवाज दडपून टाकतात, त्याचा हा नमूना आहे. एखाद्या माफ़िया टोळीला शोभण्यासारखाच हा अविर्भाव नाही काय? बहुधा नरके यांना इंग्रजी वाचता येत नसावे किंवा वाचता येत असूनही त्यातला आशय उमजत नसावा, अन्यथा त्यांनी असे स्वत:चे जाहिर वस्त्रहरण कशाला करून घेतले असते?

निरंजन टकले यांचा ‘कारवान’मधला लेख आणि त्याच्या इंडीयन एक्सप्रेस या दैनिकात उडवलेल्या चिंधड्या, नरके यांनी वाचलेल्या नसाव्यात. त्यांना दोन्ही लेखातला तपशील वा मुद्देही ठाऊक नसावेत. पण निरंजन टकले या मुर्खाने जे काही लिहिले तो पुरोगामी असल्याने प्रकाश बाळ यांनी निमूट मान्य करावे, असा नरके यांचा आग्रह आहे. पुण्याच्या इवल्या डबक्यात पुरोगामी बुद्धीमंत म्हणून वळवळणार्‍या नरके यांना दिल्लीत वा अन्यत्र जगाच्या पाठीवर अशी शेकडो पुरोगामी डबकी आहेत आणि अलिकडल्या काळात सत्याच्या जंतुनाशक फ़वारणीने त्यांची साफ़सफ़ाई होत असल्याचेही त्यांना भान नसावे. अन्यथा प्रकाश बाळ यांनी स्वेच्छेने खुलासा करून टकले यांची कशाला भादरली, ते नरके यांच्या लक्षात आले असते. पण बाळ यांना नरके यांच्यासारखी स्वत:च्या मुर्खपणाचे प्रदर्शन मांडण्याची हौस नाही आणि निदान आपण नरके यांच्यासारख्यांच्या पंगतीत बसून जगासमोर मुर्ख ठरू नये, याची चिंता असावी. म्हणून त्यांनी लोकमतमध्ये गडबडीने लेख लिहून आपण असल्या मुर्खांच्या पुरोगामी टोळीतले नाही, हे सिद्ध करण्याची घाई केलेली असावी. कारण टकले यांनी जो काही मुर्खपणा कारवानच्या लेखातून केलेला आहे, त्यातला प्रत्येक मुद्दा व संशय एक्सप्रेसच्या बातमीतून खोटा पडलेला आहे. शिवाय त्यातून टकले हा इसम कुठलीही माहिती घेण्यासाठी कुठे फ़िरला नाही की त्याची छाननी त्याने केली नाही, त्याचाही बुरखा त्या बातमीने फ़ाडलेला आहे. मृताच्या बहिणीच्या मनातील अगोचर शंकांना शोध पत्रकारितेचे नाव देऊन टकले याने अमित शहांच्या नावावर बालंट आणण्याचा अत्यंत बालीश प्रयत्न केलेला आहे. जिथे त्यला पुरक माहिती मिळाली नाही, तिथे बेधडक खोट्याच गोष्टी द्डपून दिलेल्या आहेत. त्याचेच पुर्ण पोस्टमार्टेम एक्सप्रेसमध्ये आलेले आहे. पण नरकेंना इंग्रजीचा गंध नसेल तर काय व्हायचे?

प्रकाश बाळ यांनी असा खुलासा वा लेख लिहून मोदी शहांना मदत केल्याचा आणखी एक महान शोध नरके यांनी लावला आहे. त्यांना जगात काय चालले आहे आणि जग कुठून कुठे येऊन पोहोचले आहे, त्याचाही थांगपत्ता नसावा. तसे नसते तर त्यांना प्रकाश बाळ यांच्याही आधी शिव विश्वनाथन या प्राध्यापकाने असाच लेख नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचीशपथ घेतली, त्याच दिवशी लिहून प्रसिद्ध केल्याचे ठाऊक असते. जे काही मुद्दे बाळ यांनी आपल्या लेखात नुसते मांडले आहेत, त्याचे दिर्घ व तपशीलवार विवेचन विश्वनाथन यांनी तेव्हाच केलेले होते. नरके, टकले वा तत्सम पुरोगाम्यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीने नरेंद्र मोदींना इतके मोठे यश कसे मिळवून दिले, त्याचा तो उहापोह वाचण्यासारखा आहे. कदाचित बाळ यांनी तो वाचला असावा आणि म्हणूनच आपल्याला टकले नरके अशांच्या मुर्ख गोतावळ्यातून बाजूला राखण्याचे काम सुरू केलेले असावे. मात्र नरकेंना इंग्रजीच येत नसल्याने ते एक्सप्रेस वाचत नाहीत की द हिंदूमधला विश्वनाथन यांचा लेख वाचत नाहीत. फ़क्त कोणी माफ़िया टोळीच्या विरोधात साक्ष द्याल तर याद राखा, अशी दमदाटी करीत असतात. पण त्यांच्याच लिखाणातून किती खोटेपणा व बदमाशी चव्हाट्यावर येत असते, त्याचाही त्यांना थांगपत्ता नसतो. चार वर्षापुर्वीचा हा ‘लिंबूटिंबू’ अ़चानक पुरोगामी टोळीचा बॉस कधी झाला, हे मात्र रहस्य आहे. प्रकाश बाळ यांना दमदाटी करण्यापर्यंत नरकेंना पुरोगामी माफ़िया टोळीचे म्होरकेपण कधी मिळाले ह्याचा शोध घेणे अगत्याचे आहे. अशा निर्बुद्ध लोकांना कॉग्रेसी वर्षासने व वतने लावून देण्यावरच गेली कित्येक वर्षे हे तथाकथित बुद्धीमान समाजाला ओलिस ठेवत राहिलेले आहेत. नरके यांनी दाभोळकर यांच्या मृत्यूदिनी त्यांच्या केलेल्या बदनामीचा लेखाजोखा कधीतरी करावा लागणार आहे. किंबहूना नजिकच्या काळात त्याचेही पोस्टमार्टेम करूच.

8 comments:

  1. निरंजन टकले, प्रकाश बाळ आणि हरी नरके हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत!!! त्यांना अनुल्लेखाने मारणे हेच श्रेयस्कर!!

    ReplyDelete
  2. Bhau Indian Express madhye publish jhalela ECG report pahila asta tar tumhi ha lekh lihila nasta. Bhau tumhi Marmik madhye lihit hota tevha pasun tumche lekh vachat aahet.... nirpekshta sodu naka....please

    ReplyDelete
  3. Excellent, truth is always naked..
    Mr. Bal Narake must read and introspect on this...

    ReplyDelete
  4. बर वाचा फोडलीत.नरके सारखे लोक माफिया पेक्षा टोळीगिराी करतात.

    ReplyDelete
  5. Bhau, can you give me link of that article please?

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    आपसांतली भांडणं आपसांत ठेवणे ही माफियांची कार्यपद्धती असली तरी बिगर माफिया देखील असेच वागतात. शंभर अधिक पाच हे तर पांडवांच्या वेळचं आहे. त्यामुळे हरी नरके यांच्यावर माफियाबाजी केल्याचा आरोप पटला नाही. अर्थात, तुम्ही पत्रकारिता क्षेत्रातले दिग्गज असल्याने तुम्हांस (माझ्यापेक्षा) अधिक जाण आहे.

    मात्र असं असलं तरी प्रकाश बाळ यांनी जाहीर भाष्य केलं ते बरोबर आहे. निरंजन टकले यांनी जाहीर आरोप केले होते, त्यावर प्रकाश बाळ यांनी जाहीर भाष्य करणं उचित आहे. हरी नरके यांचा मुद्दा तत्त्वत: मान्य असला तरी या प्रकरणांत तो लागू पडंत नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  7. भाऊ, हे सर्व वाचायचे आहे. कृपया लिंक ध्या

    ReplyDelete
  8. Bhau Waiting for this post Mortam!!! "नरके यांनी दाभोळकर यांच्या मृत्यूदिनी त्यांच्या केलेल्या बदनामीचा लेखाजोखा कधीतरी करावा लागणार आहे. किंबहूना नजिकच्या काळात त्याचेही पोस्टमार्टेम करूच."

    ReplyDelete